वर्ष २००५. जुलै महिना होता. कोकणातील जुई गाव. गावाच्या माथ्यावर डोंगर. धो-धो पाऊस सुरू होता. गावातील गुराख्यांनी डोंगरावरची झाडं वाकलेली पाहिली, वरच्या बाजूला भेगा रुंदावत होत्या. सायंकाळी गावकरी जमले. काय करायचे सुचेना. सरपंचाला कळवायचे तर तो दूर राहत होता. त्यामुळे सकाळी सरपंच आणि तलाठ्याला कळवायचे ठरले. लोंक पांगले आणि थोड्याच वेळात दरड कोसळली. ९७ लोकांचा जीव गेला. दरड कधीच अचानक कोसळत नाही. आधी इशारा देतात. तो समजला तर ठीक, नाहीतर गावंच्या गावं गडप होतात. कोकणातील दरडींच्या चार घटनांमध्ये मिळालेल्या इशाऱ्याची ही कहाणी. तसेच, दरडी म्हणजे काय, त्यांचे प्रकार, त्या कोसळण्याची नैसर्गिक – मानवनिर्मित कारणे, त्या इशारा कसा देतात, तो कसा ओळखायचा, या समस्येवरील उपाय कोणते.. या सर्व मुद्द्यांवर प्रकाश टाकणारा व्हिडिओ. या विषयावर दरडींचे तज्ञ डाॅ. सतीश ठिगळे यांची भवताल चे संपादक अभिजित घोरपडे यांनी घेतलेली मुलाखत.

Home » गाव गिळणाऱ्या दरडींची कहाणी…
previous post
next post