कोकण हे जैवविविधतेने नटलेली आहे. पण काही व्यक्ती ही जैवविविधता जोपासत आहेत. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. कोल्हापुरातील गार्डन्स क्लबने अशा ठिकाणी भेटी देऊन एक आगळेवेगळे पर्यटन केले. त्याचा हा व्हिडिओ स्मिता पाटील यांनी तयार केला आहे. नेहमीपेक्षा वेगळा व हटके असणारा हा व्हिडिओ बरीच काही माहिती देऊन जातो. पर्यावरणाबाबत जागृत करतो. कोकणातील ७०० वर्षापूर्वीचे धामापूरचे श्री भगवती मंदीर, देसाई यांची बिन भितीची शाळा ( युनिवर्ससिटी ऑफ लाईफ), निसर्ग शाळा, जुन्या विहिरी, प्रभु यांचे शिवसृष्टी फार्म हाऊस, कोल्ड प्रोसेस कोकोनट ऑईल, पाॅटरी यासह कांदळवणची सफर तसेच कांदळवण संवर्धनासाठी कसे कार्य सुरु आहे.? स्थानिक महिला कशा प्रकारे याबाबत जागृती करत आहेत ? ती जैवविविधता जोपासण्यासाठी सुरु असलेला त्यांचा संघर्ष असे बरेच काही सांगणारा हा हटके व्हिडिओ.
