December 4, 2024
Lady it is not good to come and tickle so slowly Sandeep Jagtap Poem
Home » बाई अस हळूवार येऊन टिचकी मारून जाण बरं नाही
कविता

बाई अस हळूवार येऊन टिचकी मारून जाण बरं नाही

बाई अस हळूवार येऊन टिचकी मारून जाण बरं नाही
बाई अस हळूवार येऊन टिचकी मारून जाण बरं नाही

स्वप्नांना पंख देऊन
पाय कापून घेणं बरं नाही

बाई अस हळूवार येऊन टिचकी मारून जाण बरं नाही

मी कुठ मोती मागितले, थोडीशी माती हवी
मी कुठ मोती मागितले, थोडीशी माती हवी
तुझं अख्ख वावर तुला ठेव
काठा मेराला जागा द्यावी

तुझं अख्ख वावर तुला ठेव
काठा मेराला जागा द्यावी
होकाराच्या पावसासाठी
मन किती जळलं होतं

होकाराच्या पावसासाठी
मन किती जळलं होतं
समजूतीच्या जात्यामध्ये
मी नकारांना दळलं होतं

समजूतीच्या जात्यामध्येमी
नकारांना दळलं होतं
काल वळवा सारखं येऊन
तू मला अस्ताव्यस्त केलं

काल वळवा सारखं येऊन
तू मला अस्ताव्यस्त केलं
चांगल वाळत पडतं होतं आयुष्य
कशासाठी... केलं ओलं ?

संदीप जगताप

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading