September 9, 2024
Phase III trial of India's first indigenous dengue vaccine begins
Home » भारतातील पहिली स्वदेशी डेंग्यू लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात
संशोधन आणि तंत्रज्ञान

भारतातील पहिली स्वदेशी डेंग्यू लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि पॅनिशिया बायोटेक यांनी संयुक्तपणे भारतातील पहिली स्वदेशी डेंग्यू लस, डेंगीऑल याच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीची केली सुरुवात

नवी दिल्ली – भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च,ICMR) आणि पॅनिशिया बायोटेक (Panacea Biotec) यांनी  भारतात डेंग्यू आजाराच्या लसीच्या पहिल्या टप्प्यातील तिसरी; रुग्णांवरील प्रत्यक्ष चाचणी (क्लिनिकल चाचणी) सुरू करण्याची घोषणा केली आहे. या महत्त्वाच्या चाचणीमुळे पॅनिशिया बायोटेक द्वारे विकसित भारतातील स्वदेशी निर्मित टेट्राव्हॅलेंट डेंग्यू लस,डेंगी ऑल( DengiAll) या लसीच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन होऊ शकेल. पंडित भागवत दयाल शर्मा पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PGIMS), रोहतक येथे आज या चाचणीतील पहिल्या सहभागीला ही लस देण्यात आली.

“भारतातील पहिल्या स्वदेशी डेंग्यू लसीसाठी या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीची सुरुवात डेंग्यूविरुद्धच्या आमच्या लढ्यात महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते. या सर्वव्यापी आजारापासून आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याची आमची बांधिलकी त्यातून प्रतिबिंबित असून लस संशोधन आणि विकासामध्ये भारताच्या क्षमतांना अधोरेखित करते,असे हा वैशिष्ट्यपूर्ण टप्पा गाठत असताना त्याविषयी  बोलताना, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, जे. पी. नड्डा म्हणाले. आयसीएमआर(ICMR) आणि पॅनिशिया बायोटेक  यांच्यातील या सहकार्याद्वारे, आम्ही केवळ आमच्या देशातील लोकांचे आरोग्य आणि स्वास्थ्य कल्याण सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे इतकेच नव्हे, तर आरोग्य सेवा क्षेत्रातील आत्मनिर्भर भारताच्या आमच्या ध्येयाचे सबलीकरणही त्यायोगे होत आहे”

सध्याच्या काळात, भारतात डेंग्यूविरूद्ध कोणतेही विषाणू विरोधी (अँटीव्हायरल) उपचार किंवा परवानाकृत लस नाही. चारही प्रकारच्या सेरोटाइपसाठी चांगली परिणामकारकता प्राप्त करणे आवश्यक असल्यामुळे प्रभावी लस निर्मितीचा विकास जटिल आहे. भारतात, डेंग्यू विषाणूचे चारही सेरोटाइप अनेक प्रदेशांमध्ये  एकत्र संचार करताना किंवा एकत्रितपणे आढळतात.

टेट्राव्हॅलेंट डेंग्यू लस स्ट्रेन (TV003/TV005), मूलतः नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH), यूएसए द्वारे विकसित केले आहे, जगभरातील प्रीक्लिनिकल आणि क्लिनिकल चाचण्यांमध्ये या लशीने आशादायक परिणाम दर्शवले आहेत.पॅनेसिया बायोटेक, ही स्ट्रेन प्राप्त करणाऱ्या तीन भारतीय कंपन्यांपैकी एक असून,विकासाच्या सर्वात प्रगत टप्प्यावर आहे. कंपनीने सर्व प्रकारच्या सेरोटाईप विषाणूंवर उपयुक्त अशी संपूर्ण लस तयार करण्यासाठी या स्ट्रेनवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे आणि या कामासाठी प्रक्रिया पेटंटही मिळवलेले आहे. 2018-19 मध्ये भारतीय लस तयार करण्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या होत्या ज्याचे  आशादायक परिणाम प्राप्त झाले होते.

आयसीएमआर पॅनिशिया बायोटेक यांच्या सहकार्याने,भारतातील 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 19 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या आयोजित करणार असून, ज्यामध्ये 10,335 हून अधिक निरोगी प्रौढ सहभागी  होतील.या  चाचणीसाठी निधी हा , प्रामुख्याने ICMR द्वारे उपलब्ध होत असून, दोन वर्षांसाठी सहभागींसोबत पाठपुरावा करण्यासाठी Panacea Biotec कंपनीचे त्यास  आंशिक निधी समर्थन आहे. हा उपक्रम भारतातील सार्वजनिक आरोग्याच्या सर्वात कठीण  आव्हानांपैकी असून एक स्वदेशी लस विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि आत्मनिर्भर भारतासाठी राष्ट्राच्या वचनबद्धतेचे ते उत्तम प्रातिनिधिक उदाहरण आहे.

डेंग्यु प्रादुर्भावामध्ये भारत ३० व्या क्रमांकावर

डेंग्यू हा भारतातील सार्वजनिक आरोग्यात  एक प्रमुख चिंतेचा विषय असून या रोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या देशांमध्ये भारत  30 व्या क्रमांकावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार(WHO) 2023 च्या अखेरीस 129 हून अधिक देशांमध्ये डेंग्यू विषाणूजन्य आजाराची नोंद झाली असून  गेल्या दोन दशकांमध्ये डेंग्यूच्या जागतिक प्रसारामध्ये सातत्याने वाढ होत आहे. भारतात, अंदाजे 75-80% रूग्ण हे संसर्गाची  लक्षणे दाखवत नाहीत, तरीही या व्यक्तीना दंश करणारे  एडिस डास  त्याव्दारे संसर्ग पसरवू शकतात. 20-25% रुग्णांमध्ये जेथे लक्षणे वैद्यकीयदृष्ट्या स्पष्टपणे दिसून येतात,यापैकी  मुलांना रुग्णालयात दाखल करायला लागण्याचा आणि मृत्यूचा धोका जास्त असतो. प्रौढांमध्ये,हा रोग डेंग्यू हेमोरेजिक ताप आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम सारख्या गंभीर परिस्थितींमध्ये परीवर्तीत होऊ शकतो. डेंग्यू विषाणूचे चार सेरोटाइप आहेत, 1-4,ज्यांत एकमेकांपासून विषाणूंचा प्रकार वेगवेगळा असला तरी संसर्ग होणे टळत नाही( क्रॉस-संरक्षण कमी असते), म्हणजे व्यक्तींना वारंवार संसर्ग होऊ शकतो.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

आळसंद ला सोमवारी पाचवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

वैयक्तिक हमीदारांसंदर्भातील महत्त्वपूर्ण निकालाबाबत

प्रवासायन…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading