साहित्यकणा फाउंडेशनचे मनिषा पाटील, तन्वी अमित, यशवंत माळी, पुष्पा चोपडे, नीरजा, सुनील विभूते यांना पुरस्कार जाहीर
नाशिक येथील साहित्यकणा फाउंडेशनतर्फे कविता, कथा, कादंबरी व बालसाहित्य या चार वाड्मय प्रकारातील साहित्यकृतींना देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
यंदाचा सुमनताई पंचभाई स्मृती कवितासंग्रह पुरस्कार मनीषा पाटील हरोलीकर (सांगली) यांच्या ‘नाती वांझ होतांना’ व तन्वी अमित (नाशिक) यांच्या ‘आवर्ती अपूर्णांक’ या दोन कवितासंग्रहास जाहीर झाला. मीराबाई गोराडे स्मृती कथासंग्रह पुरस्कार प्रा. यशवंत माळी (सांगली) यांच्या ‘उलघाल’ व पुष्पा चोपडे (नाशिक) ‘मन न्यारं रे तंतर’ या दोन कथासंग्रहास जाहीर झाला. शिलाताई गहिलोत-राजपूत कादंबरी पुरस्कार नीरजा (मुंबई) यांच्या ‘थिजलेल्या काळाचे अवशेष’ या कादंबरी निवड करण्यात आली आहे तर राहुल पाटील स्मृती बालसाहित्य पुरस्कार‘सुरस धातू गाथा’ या साहित्यकृतीसाठी प्रा. डॉ. सुनील विभूते यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे साहित्यकणाचे अध्यक्ष संजय द. गोराडे यांनी जाहीर केले आहे.
एकदिवशीय राज्यस्तरीय साहित्यकणा संमेलन युवा साहित्य अकादमी विजेते ऐश्वर्य पाटेकर यांच्या अध्यक्षते खाली होणार आहे, पुरस्कारार्थींना या संमेलनात रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात येईल. १२ फेब्रुवारीला समर्थ मंगल कार्यालय , कॅनडा कॉर्नर, डोंगरे वसतिगृह, नाशिक होणार असल्याची माहिती सचिव विलास पंचभाई दिली.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.