हा विष्णू अवतार असूनही चतुर्भुज नाही. त्याच्या हातात शस्त्र नाही. त्याला या अवतारात शस्त्राची आवश्यकता वाटत नाही. कारण त्याने सगळ्या शत्रूंचा निःपात केला आहे. आणि केवळ भक्तांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी हितगूज करण्यासाठीच हा अवतार धारण केला आहे.
मीरा उत्पात-ताशी. 9403554167.
विठ्ठलाच्या पावलांवर ध्वजांकुशवज्रादि चिन्हे आहेत. तळपायावरचा ध्वज म्हणजे भक्तांना भवसागरातून पार नेणाऱ्या जहाजावरचे शीड आहे. मत्त हत्ती प्रमाणे बलाढ्य असणाऱ्या मनाचा निग्रह करणारा अंकुश आहे. पापांचे पर्वत छेदून टाकणारे वज्र आहे.
विठ्ठलाच्या पायात तोडे आहेत. संकल्प आणि विकल्प गेल्यावर हरिचरणाची उपासना करणाऱ्या भक्तांना जन्ममरणाचा फेरा नाही असे पायातले तोडे सांगतात. दोन्ही पायांच्या मध्ये पितांबराचा सोगा आहे. कमरेला मेखला आहे. त्याने दोन्ही हात कमरेवर ठेवले आहेत. कारण
प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां।
नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात्।
विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः।
आपल्या प्रिय भक्तांना जीवनरूपी भवसागर कमरेइतकाच उंच असल्याने सहज पार करता येईल हे समजावून सांगण्या साठी त्याने कमरेवर हात ठेवले आहेत.
हा विष्णू अवतार असूनही चतुर्भुज नाही. त्याच्या हातात शस्त्र नाही. त्याला या अवतारात शस्त्राची आवश्यकता वाटत नाही. कारण त्याने सगळ्या शत्रूंचा निःपात केला आहे. आणि केवळ भक्तांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी हितगूज करण्यासाठीच हा अवतार धारण केला आहे. त्यामुळे त्याच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. तो द्विभूज आहे.
डाव्या हातात शंख आहे. शंख हे ज्ञानाचे प्रतिक आहे. उजव्या हातात कमळपुष्प आहे. ते पावित्र्य आणि मांगल्याचे प्रतिक आहे. आपल्याला भेटायला येणाऱ्या भक्तांचे स्वागत करण्यासाठी त्याने ते हातात घेतले आहे. कमरेच्या डाव्या बाजूला अर्धांगी रुक्मिणीला बसायची जागा आहे.
पोटावर त्रिवळी आहे.
ब्रह्मदेवाचे उत्पत्ती स्थान असलेले नाभिस्थान आहे. मनगटात मणिबंध आहेत. दंडांमध्ये बाजूबंद आहेत. गळ्यात कौस्तुभ मण्यांचा हार आहे. यातील मणी म्हणजे त्याच्या पदी लीन झालेले हृदयातील संत आहेत. हृदयावर श्रीवत्सलांछन (भृगुऋषींनी मारलेल्या चरणाची खूण ) आणि श्रीनिकेतन (लक्ष्मीचे निवासस्थान)आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.