December 8, 2022
Poem on Rangpachami by Sunetra Vijay Joshi
Home » पुन्हा एकदा..
कविता

पुन्हा एकदा..

पुन्हा एकदा..

पुन्हा एकदा रास रंगू दे
फिरून वाजू दे तीच बासरी
पुन्हा सुखदुःखास विसरुनी
फेर धरू दे यमुनातिरी…

पुन्हा रंग फेक गुलाबी
प्रेम रंगात पुन्हा न्हाऊ दे
सोडून द्वारका सखा श्रीहरी
पुन्हा भेटण्या मला येऊ दे..

तुझ्या निळाईत गौर काया
पुन्हा सावळी मला होऊ दे
तुझ्यात विलीन होऊन मोहना
भक्तिरसातच चिंब भिजू दे..

असा रंग तू लाव मला
कधीही जो फिका न पडो
रंगात रंगुनी सावळ्याच्या
त्या कृष्णाशी ऐक्य जडो…

अशी होऊ दे रंगपंचमी
माझे रुप कुणा न कळू दे
बघेल मला जर कुणी तयाला
तूच तूच सर्वत्र दिसू दे..

सौ सुनेत्रा विजय जोशी,
रत्नागिरी.

Related posts

पापणी

मौनातल्या कळ्यांना, थेट भेटलेलंच बरं असतं…

शब्दाची मर्यादा

1 comment

Adv. Sarita Patil March 20, 2022 at 12:09 PM

अप्रतिम कविता👌👌

Reply

Leave a Comment