पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष, लेखक कवी राजन लाखे यांची ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणाऱ्या कवीकट्ट्याच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. सातारा येथे १, २, ३, ४ जानेवारी २०२६ रोजी हे मराठी साहित्य संमेलन होत आहे.
८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून राजन लाखे हे कविकट्टाचे संयोजन करत आहेत. दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या साहित्य संमेलनातही त्यांनी ही जबाबदारी सांभाळून कविकट्टा यशस्वी केलेला होता. यावेळीही साहित्य महामंडळाने त्यांच्या या यशस्वी कारकिर्दीचा विचार करून त्यांना अखिल भारतीय कवीकट्ट्याची जबाबदारी बहाल केली आहे.
पिंपरी येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविकट्टा व्यासपीठावर १०२४ कवींना, कविता सादरीकरणाची संधी मिळवून देऊन साहित्य क्षेत्रात त्यांनी विक्रम प्रस्थापित केला आहे. लाखे हे महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे तथा अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणेचे अध्यक्ष असून कविता, ललित, संपादकीय, तसेच बालसाहित्य विभागात त्यांची ९ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा “बकुळगंध” हा शान्ता शेळके जन्मशताब्दी ग्रंथ, मराठी साहित्य विश्वात नाविन्यपूर्ण ग्रंथ ठरला असून या ग्रंथाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झाली आहे.
सातारा येथे होणाऱ्या कवीकट्ट्याची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र तसेच परदेशातून कविता येण्यास सुरुवात झाली आहे. अखिल भारतीय कविकट्टा निवेदनाच्या अधीन असलेल्या अटीनुसार कविता पाठवण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२५ आहे असे सातारा कवीकट्टा नियोजन समितीने कळवले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – राजन लाखे 9637278451
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
