छत्रपती संभाजीनगर – रंधा ही भाऊसाहेब मिस्तरी लिखित कादंबरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी. ए. च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. मॉडेल कॉलेज घनसांगवी जि. जालना बी.ए ऑनर्स मराठी द्वितीय वर्ष सत्र चौथे सीबीसीएस पद्धतीनुसार जून 2023 पासून लागू करण्यात आली आहे.
भाऊसाहेब मिस्तरी यांची रंधा ही कादंबरी बहुचर्चित आहे. या कादंबरीवर अनेक मान्यवरांनी अनेक वृत्तपत्रातून नियतकालिकातून लेखन केलेले आहे. यासोबतच खान्देशी रेडू आणि गोरबोली रेडिओवर रंधा कादंबरीवर मान्यवरांनी लिहिलेल्या समीक्षांचे सलग 19 भागात प्रसारण करण्यात आले आहे. मराठवाडा साहित्य परिषदेने रंधा निर्मिती प्रक्रियेवर भाऊसाहेब मिस्तरी यांचे यापूर्वी व्याख्यान आयोजित केले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सर्जेराव जिगे यांचे रंधा कादंबरीच्या निवडी संदर्भातील पत्र भाऊसाहेब मिस्तरी यांना प्राप्त झाले आहे.