वाचनसंस्कृती वटवृक्ष बहरण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत – युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती
सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता वाचन संस्कृतीचा प्रसार होण्यासाठी आणि वाचन संस्कृती बहरण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे ही आजची सर्वात मोठी प्राथमिक गरज आहे असे प्रतिपादन युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांनी केले. त्या “राज्यस्तरीय वाचनकट्टा साहित्य पुरस्कार 2022” या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी वाचनकट्ट्याचे पेट्रन व अमरावती विभागीय उपायुक्त संजय पवार हे होते.
यावेळी बोलताना संयोगिताराजे म्हणाल्या की, “सध्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात येणाऱ्या पिढीने मोबाईल व तत्सम समाज माध्यमांवरती पुस्तके वाचणे हे आवश्यक आहेच परंतु खऱ्या अर्थाने वास्तविक जीवनात पुस्तक हातामध्ये घेऊन वाचण्यात आणि ते समजून घेण्यात खरा आनंद आहे. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये नैतिकता मूल्य आणि नातेसंबंध दृढ करण्यासाठी पुस्तकांचे वाचन खरेच खूप गरजेचे आहे.”
अध्यक्ष संजय पवार यांनी अध्यक्षीय भाषणात पुस्तक कोणते वाचावे आणि पुस्तकांचे अंतरंग कसे उमजून घ्यावे याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ” सध्याच्या ऑनलाईन जमान्यांमध्ये आपणांसमोर पुस्तकांचे अनेक पर्याय एका क्लिक वरती उपलब्ध होतात. याचा आपण सर्वांनीच चांगला उपयोग करून घेणे आवश्यक आहे. वाचनकट्टा चळवळ ही वाचन संस्कृती जपण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करत आहे आणि याचाच भाग म्हणून वाचनकट्टा साहित्य पुरस्कार प्रदान केला जात आहे याचे खरंच कौतुक आहे,” असे प्रतिपादन श्री.पवार यांनी केले.
या कार्यक्रमात सबंध राज्यभरातील दीडशेहून अधिक लेखकांच्या साहित्य कलाकृती मधून निवडलेल्या उत्कृष्ट साहित्यिकांचा आणि त्यांच्या साहित्य कलाकृतीचा “वाचनकट्टा साहित्य पुरस्कार 2022” देऊन गौरव करण्यात आला.
आबासाहेब पाटील, बेळगांव (घामाची ओल धरून), प्रा. प्रतिभा सराफ, मुंबई (उमलावे आतुनीच), नंदू साळोखे, कोल्हापूर (इपळाप), इला माटे, कोल्हापूर (अजन्माच्या जन्मकळा), सुनील मंगेश जाधव, पालघर (मी आहे), प्रेमनाथ रामदासी, सोलापूर (फ्युचर मॅन), सुनील पांडे, पुणे (रॉकी आणि टॉमी), डॉ. सुवर्णा निंबाळकर, पुणे (करवीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब), वासंती प्रकाश घाडगे, सातारा (चला लडाखला), विनायक शशिकांत होगाडे, इचलकरंजी (डियर तुकोबा), गायत्री मुळे, नागपूर (परब्रह्म).
विशेष साहित्य सन्मान – श्री. गणपत हरी पाटील, कोल्हापूर, डॉ. सुनीता चव्हाण, मुंबई, अजितसिंह चव्हाण, कराड, मनोहर महादेव भोसले, कोल्हापूर, डॉ. उत्तम सकट, कोल्हापूर, डॉ. मोहन लोंढे, सांगली, प्रा. आनंद गिरी, कोल्हापूर, डॉ. सयाजीराव गायकवाड, सोलापूर, डॉ.. महादेव शिंदे, कोल्हापूर यावेळी धनाजी सुर्वे, प्रा. क्षितिजा ताशी, प्रा. राजेश किरूळकर, सचिन लोंढे- पाटील, महेश कांबळे व लालबहादूर शास्त्री विद्यालय मणगुत्तीचे मुख्याध्यापक डी. के. स्वामी व संजय कोतेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी वाचनकट्टा मुख्य समन्वयक प्राचार्य रेखा निर्मळे, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाचे सहाय्यक संचालक डॉ. विजयकुमार जगताप, पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख, कराडचे तहसीलदार विजय पवार, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, उद्योजक युवराज पाटील, धनश्री पवार, विद्या प्रसारक मंडळ गडहिंग्लजचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी, डॉ.सरोज बिडकर, परिक्षक कवी चंद्रकांत पोतदार, शर्मिष्ठा ताशी, महावितरण विभाग मुंबईचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले, वाचनकट्टा उपाध्यक्ष संतोष वडेर, सचिव वनिता कदम, तृप्ती कागिणकर, दशरथ दळवी, सचिन कदम, दीपक परीट, राहुल अनपट, अनिता पोवार, सुजित सनगर, सुरज हावळ, तेजस पाटील, अनिल चौगुले, ऋतुजा बिरांजे, कविता सहानी, ओंकार कागीनकर, ज्ञानदा साहित्य मंचच्या अध्यक्षा अपर्णा पाटील, प्रा. निगार मुजावर, डॉ. नीला जोशी, राजनंदिनी कदम आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक युवराज कदम यांनी केले तर आभार वनिता कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही जोशी यांनी केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.