कोल्हापूर ः जैव विविधता संवर्धनात विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन, प्रा. एस. आर. यादव यांनी काढले.
न्यू कॉलेजमध्ये वनस्पती शास्त्र विभागामार्फत ‘जैवविविधता संवर्धन’ विषयावर एकदिवसीय व्याख्यान मालिका आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानादरम्यान शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील वनस्पतीशास्त्र विषयाचे नामवंत प्रा यादव यांनी उद्गार काढले.
या व्याख्यानादरम्यान त्यांनी भारतातील विविध प्रदेशातील, विविध दुर्मिळ वनस्पतींची माहिती दिली व त्यांच्या संवर्धनाबाबत महाविद्यालयिन विद्यार्थ्यांनी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे नमूद केले. मुलांनी याच वयात निसर्ग संवर्धनासाठी झोकून देऊन काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
व्याख्यानासाठी वनस्पतीशास्त्र विषयाची शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. पाहुण्यांची ओळख डॉ विनोद शिंपले यांनी तर कार्यक्रमाचे आभार डॉ निलेश पवार यांनी मानले. कार्यक्रम आयोजनास प्राचार्य डॉ व्ही एम पाटील, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ एम बी वाघमारे, डॉ सागर देशमुख व इतर सहकारी यांचे मार्गदर्शन लाभले.