बाप माझा शेतकरी
कष्ट शेतात खपे दिनरात
लाखोंचा पोशिंदा असतो
राबतो शेतात अहोरात
झाला सध्याचा प्रगत शेतकरी
कृषि प्रधान विकसित राजा
लॅपटॉप घेऊनी बसला हाती
शेतात बसून विका माल सारा
करु ट्रॅक्टरने विकास आता
चेहर्यावर उमटते हास्य
हाती मशागत नाही कष्ट
नसे पत्करत कोणाचे दास्य
दिला फाटा कर्जाला
माफ झाले सारे कर्ज
मिळे पिकांना हमीभाव
आता नाही अफाट खर्च
आनंदाने पिके डोलती
हिरवाईने नटु लागती
मुले आनंदाने बागडती
स्वप्न उद्याचे पाहू शकती