प्रा. डॉ. महेश खरात, प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. भास्कर बडे, प्रा. डॉ. प्रतिभा जाधव , एकनाथ आव्हाड, नितीन भट, प्रा. डॉ. श्रीकांत पाटील , संजय चौधरी, प्रा. डॉ. राजेंद्र माने , डॉ. स्मिता पाटील, प्रा. आनंत सुर, प्रा. डॉ. ज्योती कदम, सुभाषचंद्र जाधव यांच्या साहित्यकृतीस पुरस्कार
मंगळवेढा – महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगरच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या विविध पुरस्कारांचे वितरण रविवार १४ ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता ज्ञानदीप शिक्षण संकुलात होणार आहे, अशी माहिती दामाजीनगर मसापचे अध्यक्ष प्रकाश जडे यांनी दिली आहे.
पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक, कवी सुनिल शिनखेडे यांचे हस्ते होणार आहे. कवी, लेखक व माध्यम स्नेही असणाऱ्या सुनिल शिनखेडे यानी सोलापुर आकाशवाणी केंद्राचे सहाय्यक संचालकपदही भुषवले आहे. त्यानी १९८० मध्ये नागपुरातुन पत्रकारतेची सुरवात केली. कविता, ललित, समीक्षा अशी त्यांची पाच पुस्तके प्रसिध्द आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारितता अभ्यासक्रमासाठी “बातम्याची विविध क्षेत्रे” हा पुस्तकसंचही त्यांनी केला आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे सोलापुर जिल्हा प्रतिनिधी कल्याण शिंदे भुषवणार आहेत. तर ज्येष्ठ कवी मारूती कटकधोंड हे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.
पुरस्काराचे मानकरी असे –
मातोश्री लक्ष्मीबाई भास्कर जोशी स्मृती पुरस्कार प्रा. डॉ. महेश खरात यांच्या ब्रुगोट या कादंबरीस, ज्योती जाधव स्मृती पुरस्कार प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे यांच्या आदिवासींचे ही-डॉ.बाबासाहेब आंबेडकर या वैचारिक पुस्तकास, मारुतीराव पंडित स्मृती पुरस्कार प्रा. डॉ. प्रतिभा जाधव यांच्या अस्वस्थतेची डायरी या ललितग्रंथास, इंदुमती शिर्के स्मृती पुरस्कार एकनाथ आव्हाड यांच्या छंद देई आनंद या बालसाहित्यास, सिध्दमाला ढगे स्मृती पुरस्कार डॉ. भास्कर बडे यांच्या बाईचा दगड कथासंग्रहास, अमोल इंगळे स्मृती पुरस्कार नितीन भट यांच्या उन्हात घर माझे – कवितासंग्रहास, ज्ञानोबा सलगर स्मृती पुरस्कार प्रा. डॉ. श्रीकांत पाटील यांच्या ऊसकोंडी कादंबरीस, सुरेश दत्तु स्मृती पुरस्कार संजय चौधरी यांच्या आतल्या विस्तवाच्या कविता या कवितासंग्रहास, इंदुमती जडे स्मृती पुरस्कार प्रा. डॉ. राजेंद्र माने यांच्या आठवणीच्या पारंब्या या ललित साहित्यकृतीस, पदमिनी कृष्णा यादव स्मृती पुरस्कार डॉ. स्मिता पाटील यांच्या नाही गिरवता येत कुठलीच लिपी या कवितासंग्रहास, शहिद राजकुमार ठोंबरे स्मृती पुरस्कार प्रा. आनंत सुर यांच्या भोगवटा या कथेस, मसाजी शिवशरण स्मृती पुरस्कार प्रा. डॉ. ज्योती कदम यांच्या सारेच कोठे अलबेल आहे या कविता संग्रहास, मोहन भास्कर जोशी स्मृती पुरस्कार सुभाषचंद्र जाधव यांच्या तुमसे अच्छा कौन है या चरित्रास यांना जाहीर झाला आहे.
नवोन्मेशसाठी देण्यात येणारा वासुदेव शंकर मेरू स्मृती पुरस्कार प्रा. राजेश भोजने यांना तर साहित्यप्रेमीसाठी देण्यात येणारा कलावती वाकळे स्मृती पुरस्कार पद्माकर कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती दामाजीनगर मसापचे अध्यक्ष प्रकाश जडे यांनी दिली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.