December 10, 2022
APEDA made Table of 50 agricultural products with good export potential
Home » चांगली निर्यात क्षमता असलेल्या 50 कृषी उत्पादनांची सारणीः अपेडा
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

चांगली निर्यात क्षमता असलेल्या 50 कृषी उत्पादनांची सारणीः अपेडा

कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने  चांगली निर्यात क्षमता असलेल्या 50 कृषी उत्पादनांची  सारणी  तयार केली आहे अशी माहिती अपेडाचे अध्यक्ष डॉ एम अंगमुथू यांनी दिली आहे.

मालवाहतुकीचे चढे दर, कंटेनरचा तुटवडा यांसारख्या कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या लॉजिस्टिक आव्हानांना न जुमानता, भारताच्या कृषी निर्यातीने 2021-22 या वर्षात  50 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला  आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणने  (APEDA),   USD 25.6 अब्ज डॉलर्सच्या कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांची निर्यात करून एक नवा इतिहास रचला आहे, जो भारताच्या एकूण USD 50 अब्ज कृषी निर्यातीच्या 51 टक्के आहे.

याशिवाय, अपेडाने  25.6 अब्ज डॉलर्सची  शिपमेंटची  नोंदणी करून आर्थिक वर्ष 2021-22 साठी 23.7 अब्ज डॉलर्सचे आपले निर्यात लक्ष्य देखील पार केलं आहे. वाणिज्य गुप्तवार्ता आणि सांख्यिकी महासंचालनालयाने (DGCI&S )  जाहीर केलेल्या अंदाजित आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये कृषी निर्यात 19.92 टक्क्यांनी वाढून 50.21 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. वाढीचा दर उल्लेखनीय असून  तो 2020 – 21 मध्ये गाठलेल्या 41.87 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 17.66 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. मालवाहतुकीचे चढे दर, कंटेनरची कमतरता सारखी  अभूतपूर्व लॉजिस्टिक आव्हाने असतानाही साध्य केला  आहे.

गेल्या दोन वर्षांतील ऐतिहासिक कामगिरी शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यात  खूप उपयुक्त ठरेल. एकूण कृषी निर्यातीच्या तुलनेत, अपेडाची  निर्यात 2020-21 मधील  22.03 अब्ज डॉलर्सवरून 16 टक्के वाढीसह  2021-22 मध्ये 25.6 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. 2021-22 मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत अपेडा  उत्पादनांनी नोंदवलेला सर्वोच्च वाढीचा दर  30 टक्क्यांहून अधिक आहे.

निर्यात होते ते देश

2021-22 च्या आकडेवारीनुसार अपेडा  ज्या देशांना प्रामुख्याने  निर्यात करते ते देश आहेत- बांग्लादेश, युएई , व्हिएतनाम, अमेरिका , नेपाळ, मलेशिया, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, इराण आणि इजिप्त.

कृषी-निर्यातीत लक्षणीय वाढ ही  कृषी आणि प्रक्रिया युक्त खाद्य  उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यावर भर देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुरावा  म्हणून पाहिले जाते. विविध देशांमध्ये B2B प्रदर्शने आयोजित करणे, भारतीय दूतावासांच्या सक्रिय सहभागाने उत्पादन विशिष्ट आणि सामान्य विपणन मोहिमेद्वारे नवीन संभाव्य बाजारपेठांचा शोध घेणे यासारख्या अपेडाच्या  मार्फत केंद्र सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे कृषी आणि प्रक्रिया युक्त खाद्य उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाली आहे.

कृषी उत्पादनांची निर्यात वाढविण्यासाठी सरकारने राज्य सरकारांच्या सहकार्याने 300 हून अधिक लोकसंपर्क कार्यक्रमांचे आयोजन केले.

आम्ही 50 कृषी उत्पादनांसाठी उत्पादने सारिणी  देखील तयार केली आहे ज्यात  आमच्या निर्यात पोर्टफोलिओच्या  विस्ताराला चांगला वाव आहे . निर्यातीला चालना देण्यासाठी अपेडा  विविध आंतरराष्ट्रीय व्यापार विश्लेषणात्मक माहिती, बाजारपेठेतील संधीची  माहिती  संकलित करते आणि  निर्यातदारांमध्ये प्रसारित करते  आणि व्यापार संबंधी शंकांचे निरसन करते.

डॉ एम अंगमुथू

अध्यक्ष, अपेडा

पीएम  गति शक्ती – राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा एक भाग म्हणून, अपेडा  नाशवंत कृषी उत्पादनांच्या जलद वाहतुकीद्वारे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंत्रालयासह  विविध मंत्रालयांशी सहकार्य  करत आहे, शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs), सहकारी संस्था आणि महिला उद्योजकांना निर्यातदारांशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अपेडाच्या संकेतस्थळावर  फार्मर कनेक्ट पोर्टल देखील स्थापन  करण्यात आले आहे. पोर्टलवर आतापर्यंत सुमारे 3,295 एफपीओ  आणि एफपीसी  आणि 3,315 निर्यातदारांची नोंदणी झाली आहे. अपेडा बरोबर 24  लाखांहून अधिक सेंद्रिय शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. भारत हा जगात सेंद्रिय उत्पादनांचा आघाडीचा उत्पादक आहे.

तक्ता: कृषी आणि प्रक्रिया युक्त खाद्य उत्पादनांची  निर्यात तुलना

Products2021-22USD million2020-21USD million
Rice96548829
Dairy Products634323
Pulses358265
Other Cereals1083705
Cashew452420
Wheat2118567
Fruits & Vegetables17891617
Processed Products12021120
Floriculture products10377 
Sheep/goat meat6034 
Buffalo meat33033171 
Poultry7158 
Miscellaneous processed items47534844 
Total2558022030 

स्रोत: DGCIS, मार्च 2022 च्या ट्रेड अलर्टवर आधारित आणि बदलाच्या अधीन आहे

Related posts

पॅन्सी फुलपाखरे…

निकेतचा संदेश पत्र संग्रह हा दुर्मीळ खजिना – विलास गुर्जर

छत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार

Leave a Comment