सातारा येथील कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानच्यावतीने उत्कृष्ट वाङमय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे २७ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.
कुंडल कृष्णाई प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना डिसें २०१९ मधे झाली. या प्रतिष्ठानद्वारे वाचन संस्कृती जोपासण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. पुस्तकांमुळे माणसाचे आयुष्य समृद्ध होते, भाषेचे संवर्धन होते म्हणून उत्कृष्ट वाङमय पुरस्कार संस्थेच्यावतीने देण्यात येतात. कविता संग्रह, कथा संग्रह, कादंबरी, समीक्षा ग्रंथ, बालसाहित्य इत्यादी साहित्य प्रकारात हे पुरस्कार देण्यात येतात. तसेच ग्रामीण भागातील मराठी शाळांना मोफत बालसाहित्य संस्थेतर्फे दिले जाते. आतापर्यंत पन्नास शाळांना मोफत गोष्टींची पुस्तके दिली आहेत. शाळेत लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमांतर्गत गोष्ट सांगणे, प्रश्नोतरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
२०२३ चे उत्कृष्ट वाङमय विजेते असे –
पुरस्कार प्राप्त कवी –
हर्षदा सुंठणकर ( बेळगाव ) – कपडे वाळत घालणारी बार्ड
आनंद बल्लाळ ( गडहिंग्लज ) – स्वातंत्र्यानंतर अजुनही
बबन धुमाळ ( पुणे ) – नवा मोहर गळतो आहे
अमोल देशमुख ( परभणी ) – आठ फोडा आन बाहेर फेका
पुरस्कार प्राप्त कादंबरी –
उर्मिला चाकूरकर, नांदेड – हिप्पोक्रेटिसची शपथ
विकास गुजर, कोल्हापूर – बाभुळमाया
पुरस्कार प्राप्त कथासंग्रह –
प्रेमनाथ रामदासी, माळशिरस – फ्यूचर मॅन
भास्कर बंगाळे, पंढरपूर – वाटणी
पुरस्कार प्राप्त समीक्षा ग्रंथ
डॉ. मारोती घुगे, जालना – १९८० पूर्वीची प्राचीन कविता
पुरस्कार प्राप्त बालसाहित्य –
मुरहारी कराड, लातूर – नव्या जगाची मुले
उत्तम सदाकाळ, जुन्नर – पाऊस
वीरभद्र मिरेबाड, नांदेड – आनंदाची फुलबाग
बबन शिंदे, हिंगोली – प्रेरणादायी कथा