📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 15, 2026
कविता

“कास” ची आरास..

कासच्या फुलांच्या रंगीबेरंगी आरासीत निसर्गाचे अद्भुत सौंदर्य उलगडणारी सारिका टेकाळे यांची भावस्पर्शी कविता. फुले, आभाळ, पक्षी आणि निसर्गाच्या दिव्य रूपाचे काव्यमय दर्शन.

पांढरी शुभ्र चवर
निळी तांबडी आभाळी
आकाशाची निलीमा पांघरून
फुललीय हिरवी फिकटशी निसुर्डी..

पिवळीधम्मक सोनकी
जांभळ्या छटांची कारवी
सीतेची आसावे पिऊन जन्मली
पंद, आषाढ आमरी..

नाजूक साजूक काप्रू, कावळा
तारागुच्छ नि तुतारी
वायतुऱ्याची नक्षी बहरदार
नववधूगत नटली मंजिरी

पान तेरडा सखा बिलोरी
मैत्रिणी केंदा अन् कुमुदिनी
गवती, धावड, अबोलीमा
सजली गौरीहार घालून गुलमेंदी

एक दिसाची निलकंठ पाहुणी
माझ्या मनास जाते भारावुनी
तिरमिरी, भांगरी, शतावरी
सवें सुनकी, चिमती, पाषाणी..

विघ्नहर्त्याचा वरद हस्त
नीलकानी शोभे साज शृंगार
सारिकाच्या हास्यात दडे जणू
“कास”ची ही दैदीप्य आरास..
“कास”ची ही दैदीप्य आरास..

कवयित्री – सारिका टेकाळे
( डांगे चौक, पुणे – पिंपरी चिंचवड )

मो. नं. – 7588680092

Related posts

प्रवासायन…

अनुभुतीचा विस्तार करणारी आजची कविता

पंढरीची वारी

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
Skip to toolbar