📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 11, 2026
कविता

दुष्काळ जाहीर करून कोणते प्रश्न सुटले..??

दुष्काळ जाहीर झाला, पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले का? करपलेली पिके, चारा-पाणीटंचाई, पशुधन आणि मदतीच्या प्रतीक्षेवर भाष्य करणारी कविता.
दुष्काळ जाहीर करून कोणते प्रश्न सुटले..??

हात जोडत तो म्हणाला,
"साहेब,
सोयाबीन करपली, मका जळाली,
जनावरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही.
त्याला मिठाचे सुद्धा वांदे झाले,
औषध पाण्यावाचून किती जण मेले?

या रखरखत्या उन्हामध्ये,
कोणीच कोणाला आसरा देइना,
तुम्हापुढे खूप रडावंस वाटतं,
पण डोळ्यामध्ये टिपूस पाणी येइना."

तेव्हा गाडीमध्ये बसताना,
साहेब म्हणाले,
"म्हणूनच आपला तालुका
दुष्काळाच्या यादीत जाहीर केलाय!"

काचा वर झाल्या, सायरन वाजले,
ताफा निघाला, धुळीचे लोट उठले...
त्याला कळलेच नाही,
दुष्काळी तालुका जाहीर करून
नेमके वरचे आपले कुठले प्रश्न सुटले?
नेमके आपले कुठले प्रश्न सुटले?

◾संदीप जगताप, 
चिंचखेड, ता. दिंडोरी,नाशिक
7218625960

Related posts

नवरा तो नवराच असतो…

श्रावण

आम्ही भारतातच निर्माण करू स्वर्ग…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
Skip to toolbar