📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 11, 2026
काय चाललयं अवतीभवती

कवी सुरेश बिले यांना राज्यस्तरीय महात्मा गांधी साहित्य पुरस्कार जाहीर

कणकवलीचे कवी सुरेश बिले यांच्या ‘बोल अंतरीचे’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय महात्मा गांधी साहित्य पुरस्कार जाहीर. ४ ऑक्टोबरला कोल्हापुरात पुरस्कार वितरण.

प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘बोल अंतरीचे’ काव्यसंग्रहाचा गौरव

कणकवली – के. एस. आय. पब्लिकेशन, इंगळी, कोल्हापूर यांच्या वतीने ४ ऑक्टोबर २०२६ रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या ३१ व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या साहित्यिकांना राज्यस्तरीय महात्मा गांधी साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

यामध्ये कणकवलीचे सुप्रसिद्ध कवी सुरेश बिले यांच्या कणकवली प्रभा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘बोल अंतरीचे’ या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय महात्मा गांधी साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

सुरेश बिले हे कणकवलीतील सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य कार्यकर्ते आहेत. सध्या ते समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेचे प्रमुख कार्यवाह म्हणून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. यांच्या ‘बोल अंतरीचे’ या काव्यसंग्रहातून सामाजिक जाणीव, मानवी मूल्ये, नातेसंबंध, ग्रामीण जीवन आणि संवेदनशील विचारांचे दर्शन घडते. विविध विषयांना प्रभावीपणे मांडणाऱ्या या साहित्यकृतीचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा ४ ऑक्टोबर २०२६ रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या ३१ व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या पुरस्काराबद्दल कवी बिले यांचे सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related posts

१९ मार्च रोजी शेतकरी का करतात उपवास ?

‘अग्निपथ’ भर्ती मेळाव्याचे कोल्हापूर येथे आयोजन

300 एकर जमीन क्षारपडमुक्त करण्याचा मानस

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
Skip to toolbar