📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 11, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Monsoon Update : प्रणालीच्या ऍडव्हान्स परिणामातून महाराष्ट्रात परतीचा पाऊस

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात २२ ते २८ सप्टेंबरदरम्यान वीजांसह पावसाची शक्यता आहे. काही भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज.

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

        
१-बंगाल उपसागरातील हवेच्या कमी दाब क्षेत्र प्रणाली आंध्र तेलंगणापर्यन्त पोहोचण्याची शक्यता असुन तिच्या प्रेरित परिणामातून संपूर्ण महाराष्ट्रात मंगळवार २२ ते सोमवार २८ सप्टेंबर पर्यंतच्या आठवड्यात वीजा व गडगडाटीसह पावसाची शक्यता जाणवत असुन मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता अधिक जाणवते.

दि. २२ सप्टेंबर – रायगड, सातारा, सोलापूर
दि. २३ सप्टेंबर – सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर
दि. २४ ते २८ सप्टेंबर – यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली

खान्देश सह उत्तर महाराष्ट्र व उत्तर विदर्भात ह्या प्रणालीचा परिणाम जाणवणार नाही.
मंगळवार दि. २९ सप्टेंबर पासुन प्रणालीचा परिणाम ओसरेल, असे वाटते.

      
२- मान्सून आज त्याच्या परतीच्या प्रवासात राजस्थान, पंजाब हरियाणा पर्यन्त पोहोचला असुन त्याच्या परतीच्या पुढील वाटचालीस वातावरण अनुकूल जाणवत आहे.

Related posts

Neettu Talks : राईस ब्रॅन आईलचे फायदे…

कृषिमित्र गजेंद्र बडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट (Ph.D.) जाहीर

पारिजातकाला भरपुर फुले येण्यासाठी काय कराल ?

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
Skip to toolbar