📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 11, 2026
कविता

दुष्काळ ..

दुष्काळाच्या झळांनी करपलेला शेतकरी, भूक-तहान आणि राजकीय दिखाव्यावर भाष्य करणारी संदीप जगताप यांची बोचरी, उपरोधिक आणि अस्वस्थ करणारी कविता.

दुष्काळ ..

दुष्काळ शेतकऱ्यांशी
नेहमी भस्मासुरासारखा वागतो
अलिकडे -
त्याच्यावर चर्चा करायला सुद्धा
काजू - बदामाचा खुराक लागतो ..!

तुम्हाला तहान लागली की ,
ते धर्मा - धर्माची गोळी देतील
खूपच भूक लागली तर
आरक्षणाची चतकोर पोळी देतील

त्यांची लटकी - लटकी भांडणं
रोज येतात टीव्ही वर
तुमचा करपून गेलेला शिवार
त्यांनी सोडून दिलाय वाऱ्यावर..!!

◾संदीप जगताप
चिंचखेड, ता. दिंडोरी,नाशिक
7218625960

Related posts

कवितेची बाग…

नमस्कार माझा त्या तुला अहिल्ये..

गोकूळी हवा धूंद आहे

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
Skip to toolbar