September 9, 2024
Shivaji Satpute poem on Current politics
Home » तुम्हीच सांगा, अध्यक्ष महोदय
कविता

तुम्हीच सांगा, अध्यक्ष महोदय

तुम्हीच सांगा, अध्यक्ष महोदय
राजकारण केव्हा करायचं..?

धरण फुटल्यावर
की खेकडे पोसल्यावर
कोरड्या धरणात नेता मुतल्यावर
की पक्षांतर करुन
नेता तांदळासारखा धुतल्यावर
का सोयाबीन, कापूस, कांदा
चाळीत सडल्यावर

तुम्हीच सांगा, अध्यक्ष महोदय
राजकारण केव्हा करायचं…?

एमपीएससी युपीसीच्या
बट्ट्याबोळ झाल्यावर
की पेपर फुटल्यावर
की पेपर फुटायच्या आधी

रस्ता बांधताना
खड्डे पडल्यावर
की ब्रिज ढासळल्यावर
पुतळे उभारताना
की पुतळे पडल्यावर

तुम्हीच सांगा, अध्यक्ष महोदय
राजकारण केव्हा करायचं…?

ड्रग्ज सापडल्यावर
की लपवल्यावर
एफ. आय. आर.
नोंदवायच्या आधी की नोंदवल्यावर

पोलिसांनी, शिक्षकांनी
अधिकाऱ्यांनी, डाॅक्टरांनी
विनयभंग केल्यावर
बलात्काराच्या आधी
की बलात्कार झाल्यावर

तुम्हीच सांगा, अध्यक्ष महोदय
राजकारण केव्हा करायचं…?

शिवाजी सातपुते मोबाईल – 9075702789


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

जादा कामाचे तास म्हणजे जादा उत्पादकता नव्हे !

अड्याळ टेकडीचे लक्ष्मणदादा नारखेडे : काही स्मृतीपुष्प

मुलांच्या अभ्यासाची चिंता सतावतेय का ?

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading