August 12, 2022
National Award for Oceanography to Dr. Aninda Muzumdar
Home » डॉ अनिंदा मुझूमदार यांना सागरी शास्त्रासाठी राष्ट्रीय पुरस्कार
काय चाललयं अवतीभवती नव संशोधन आणि तंत्रज्ञान

डॉ अनिंदा मुझूमदार यांना सागरी शास्त्रासाठी राष्ट्रीय पुरस्कार

सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेतील वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक डॉ अनिन्दा मुझूमदार यांना सागरी शास्त्रातील कामगिरीसाठी वर्ष 2022 साठीच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ मुझूमदार यांचे भारताच्या गॅस हायड्रेट शोधन मोहिमेत महत्त्वाचे योगदान आहे. कृष्णा-गोदावरी आणि कावेरी-मन्नार खोऱ्यात शीत मिथेन प्रवाह प्रणाली शोधण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. या संशोधनामुळे कृष्णा-गोदावरी आणि मन्नार खोऱ्याचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर आले आहे. आधुनिक आणि प्राचीन सागरी गाळ/ गाळाच्या खडकांचे Fe-S-C जैव-रसायनशास्त्र जाणून घेण्यातही त्यांनी योगदान दिले आहे.

सागरी विज्ञानातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने डॉ.  मुझुमदार यांना 2022 सालासाठी महासागर विज्ञानातील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. डॉ. मुझुमदार यांची नामांकित जर्नलमध्ये 50 हून अधिक प्रकाशने आहेत.

डॉ मुझूमदार यांच्या कार्याविषयी अधिका माहितीसाठी इथे क्लिक करा:
https://www.nio.org/profile/1192/dr-aninda-mazumdar

Related posts

संस्कृतीबरोबरच पर्यावरणाची जनजागृती करणारी नाटिका…

कै विठ्ठलराव केदार प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

गेल्या अर्ध शतकात २२० भारतीय भाषा लुप्त…!

Leave a Comment