व्हर्टी सिलिअम बुरशी काय आहे
भाजीपाला पिकांवर येणाऱ्या रस शोषक किडी जसे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे त्याच प्रमाणे आंबा, काजू, संत्रा या फळापिकांवर येणारे तुडतुडे, पिठ्या ढेकूण आणि खवले किटक तसेच सोनचाफा, मोगरा या फुल पिकांवर येणारे पिठ्या ढेकूण, फुलकिडे यांचे जैविक पद्धतीने प्रभावी नियंत्रण करण्यासाठी व्हर्टीसिलिअम या बुरशीचा उपयोग होतो. मानव आणि पर्यावरणासाठी ही बुरशी अत्यंत सुरक्षित आहे.
कसे काम करते?
फवारणी पंप ने ही बुरशी पिकांवर वापरली जाते. मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, पिठ्या ढेकूण आणि खवले या किटकांचा या बुरशी सोबत संपर्क आल्यास किटकाच्या शरीरावर ही बुरशी वाढते. त्यांनंतर किटक आजारी होऊन खाणे बंद होते व ४ ते ५ दिवसांत किटक मरतात.
वापर कसा करावा:
१ लिटर पाण्यात १० मिली किंवा १० ग्रॅम व्हरटिसिलीअम (१०० लिटर पाण्यात १ लिटर) घेऊन त्याची संध्याकाळ च्या वेळी शेतात फवारणी करावी.
टीप: मधमाशीची पेटी जवळ असल्यास तेथे व्हरटीसिलियमचा वापर करू नये.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.