October 6, 2024
SELL word meaning Amar Habib article
Home » Privacy Policy » सेलचा असाही एक अर्थ …!
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सेलचा असाही एक अर्थ …!

सेलचा असाही एक अर्थ …!

सेल चा एक अर्थ आहे कोठडी. तुरुंगातल्या खोल्यांना सेल म्हणतात. जास्त खतरनाक असलेल्या कैद्याला अंडासेल मध्ये ठेवतात.

योगायोग पहा ज्या तीन कायद्यांनी शेतकऱ्यांना बंदिस्त केले आहे, त्यांची अद्याक्षरे एकत्र केली तर CELL हाच शब्द तयार होतो. सी पासून सीलिंग. कमाल शेतजमीन धारणा कायदा, ई पासून इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट म्हणजे आवश्यक वस्तू कायदा आणि एल पासून लँड अक्विझिशन ऍक्ट म्हणजे जमीन अधिग्रहण कायदा. शेवटच्या एल पासून लॉ. लॉ म्हणजे कायदा. या तीन कायद्यानी शेतकऱ्यांना केले आहे कोठडीबंद. म्हणजे बंदिस्त!

कमाल शेतजमीन धारणा हा कायदा बिगर शेतजमिनीवर लागू नाही. म्हणून आज कारखानदारांकडे हजारो एकर जमीन आहे. शेतकऱ्यांवर हा कायदा लागू असल्यामुळे जमिनीचे तुकडे झाले आहेत. आज शेतजमिनीचे होल्डिंग दोन एकरच्या खाली गेले आहे. शेती परवडण्यासारखी राहिली नाही. सीलिंग कायदा नसलेले कारखानदार जमिनीचे मोठमोठे क्षेत्र बळकावून बसले आहेत व सीलिग कायदा ज्यांच्यावर लागू होतो ते शेतकरी देशोधडीला लागले आहेत.

आवश्यक वस्तू कायद्यामुळे सरकार शेतमालाचे भाव पाडू शकते. शेतीमालाला भाव मिळूच नये, अशी व्यवस्था या कायद्याने निर्माण केली आहे. शेतकऱ्याने कष्ट करून माल पिकवला असला तरी त्याचा भाव सरकार ठरवते. आयत्या बिळावर नागोबा म्हणतात तोच हा प्रकार आहे.

जमीन अधिग्रहण कायदा ही लटकती तलवार आहे. लष्कर, रस्ते, दवाखाना, शाळा अशा सार्वजनिक कामासाठी आमचा विरोध नाही पण शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन त्या कारखानदारांना देणे किंवा पुढाऱ्यांच्या संस्थाना देणे याला आमचा विरोध आहे.

या कायद्यांच्या काळकोठडीतून शेतकऱ्यांना मुक्त करणे ही काळाची गरज आहे. म्हणून वरील तीन कायदे रद्द करण्याचा आपण संकल्प करूया!

अमर हबीब, आंबाजोगाई
किसानपुत्र आंदोलन
8411909909


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading