कोल्हापूर – येथील मराठी बालकुमार साहित्य सभेमार्फत दरवर्षी उत्कृष्ठ पुस्तकांना बालसाहित्य पुरस्कार दिले जातात. याही वर्षी पुरस्कारासाठी बालसाहित्य मागविण्यात येत आहे, अशी माहिती अध्यक्ष चंद्रकांत निकाडे यांनी दिली.
बालकथासंग्रह, बालकविता संग्रह, बालनाटिका (एकांकिका), संकीर्ण बालसाहित्य, बालकादंबरी या साहित्य प्रकारांना यंदा गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. तरी १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेली पुस्तके ३१ जानेवारी २०२५ पर्यंत पाठवावीत असे आवाहन साहित्य सभेतर्फे करण्यात आले आहे.
पुस्तके पाठवण्याचा पत्ता :
कार्याध्यक्ष, नसीम इकबाल जमादार ( संपर्क – 8275918769 )
2386,डी वॉर्ड, तोरस्कर चौक, जुना बुधवार पेठ,
नावेच्या कारखान्याजवळ, कोल्हापूर पिनकोड – 416002
अधिक माहितीसाठी संपर्क –
अध्यक्ष – चंद्रकांत निकाडे 9922314564
उपाध्यक्ष – डॉ. श्रीकांत पाटील 9834342124
कार्यवाह – परशराम आंबी 9421203732
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.